अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने आलेला भलामोठा दगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हटवला

Gramin Varta
224 Views

पाचल/अंकुश पोटले : राजापूर तालुक्यातील पुणे-कोल्हापूर महामार्गावरील अनुस्कुरा घाटामध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळून एक भलामोठा दगड रस्त्याच्या मधोमध येऊन थांबला होता. यामुळे प्रवाशांना ये-जा करताना मोठा अडथळा निर्माण होऊन वाहतूककोंडी झाली होती. घाटामध्ये सतत असणारे दाट धुके आणि त्यातच रस्त्यामध्ये आलेला हा महाकाय दगड यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली होती. परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमासाठी गेलेल्या खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी ही परिस्थिती पाहताच एकीचे बळ दाखवत तातडीने पहल केली.

प्रशासन किंवा बांधकाम विभागाच्या जेसीबीन मशीनची वाट न बघता विद्यार्थ्यांनी कोणतीही अवजारे उपलब्ध नसताना आपल्या हाताने तो महाकाय दगड ढकलत रस्त्यालगत बाजूला सारला. या विद्यार्थ्यांना जर वेळीच हा रस्ता मोकळा केला नसता, तर वेगाने येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांचे मोठे अपघात झाले असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे अनेक मोठे अपघात टळले आहेत. रस्ता मोकळा केल्यानंतर विद्यार्थ्यांनी परिसरातील सभोवतालचा रस्ताही स्वच्छ केला, ज्यामुळे वाहतूक पूर्ववत सुरळीत झाली.

या सामाजिक आणि कौतुकास्पद कार्याबद्दल विद्यार्थी व मार्गदर्शकांच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे. यावेळी खापणे कॉलेजचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील, प्रा. एस. जी. चव्हाण, मधुकर साटम यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सर्व स्वयंसेवक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या धाडसी आणि समाजोपयोगी कार्याबद्दल पर्यटक, प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Total Visitors :
4839307
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *