राजापूर : वाडा-तिवरे समुद्रकिनारी अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला; नाटे पोलिसांचे ओळखीसाठी आवाहन

Gramin Varta
71 Views

राजापूर/ तुषार पाचलकर: तालुक्यातील मौजे वाडा-तिवरे येथील समुद्रकिनारी १ सप्टेंबर २०२६ रोजी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह वाहून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नाते पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची (ADR क्र. २५/२०२६) नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळला असून चेहरा पूर्णतः विद्रूप झाल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ ते ५५ वर्षे, उंची साधारण ५ फूट ३ इंच ते ५ फूट ५ इंच आणि अंगकाठी मध्यम असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या अनोळखी व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी नाटे पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. जर कोणाकडे या वर्णनाशी मिळत्याजुळत्या बेपत्ता व्यक्तीबाबत काहीही माहिती असल्यास त्यांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा नाटे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. माहिती देण्यासाठी नाटे पोलीस ठाण्याच्या ९६८४७०८३२२ या क्रमांकावर, तपास अधिकाऱ्यांशी ९७६६०५४६१५ वर अथवा रत्नागिरी पोलीस नियंत्रण कक्षाच्या ०२३५२-२२२२२२ / २७१२५७ या क्रमांकांवर थेट संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Total Visitors :
4807897
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *