रत्नागिरी एसटी स्टँडच्या पार्किंगमधून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

Gramin Varta
48 Views

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील एसटी बसस्थानकाच्या आवारातील पार्किंगमधून ३५ हजार रुपये किमतीची टीव्हीएस एन्टॉर्क दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत नंदकुमार सुर्वे (वय २६, रा. सर्वेवठार, रणपार, पो. गोळ्ये, ता. जि. रत्नागिरी) यांनी आपली लाल-काळ्या रंगाची टीव्हीएस एन्टॉर्क दुचाकी (क्रमांक एमएच ०८ एएस ९६१०) रत्नागिरी एसटी बसस्थानकाच्या आवारातील पार्किंगमध्ये उभी केली होती. ४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या संमतीशिवाय ही दुचाकी चोरून नेल्याचे निदर्शनास आले.

दुचाकीचा रत्नागिरी शहर तसेच आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊनही ती मिळून न आल्याने सुर्वे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून ४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजून ४९ मिनिटांनी गुन्हा क्रमांक ३२५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत सुमारे ३५ हजार रुपये असून तिचा चेसीस क्रमांक MD626AG7XJ2K03217 आणि इंजिन क्रमांक AG7KJ2200741 असा आहे. दुचाकीच्या व्हायझरवर ‘गुरुदेवदत्त’ आणि ‘जाकादेवी प्रसन्न’ असे मराठी भाषेतील शब्द लिहिलेले आहेत. या वैशिष्ट्यांवरून दुचाकीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Total Visitors :
4807896
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *