पाचल पंचक्रोशी मित्र मंडळाच्या वतीने ५१ हजार रुपयांची भव्य दहीहंडी; यंदा रंगणार चुरशीची रस्सीखेच स्पर्धा

Gramin Varta
8 Views

पाचल (तुषार पाचलकर): गतवर्षीच्या अभूतपूर्व यशानंतर यंदाही पाचल पंचक्रोशी मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात ‘दहीहंडी उत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवांतर्गत शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी पाचल येथील वैभव हॉटेलसमोर तब्बल ५१ हजार रुपयांची भव्य दहीहंडी उभारण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता रंगणाऱ्या या दहीहंडी सोहळ्यात राजापूरचे नामांकित ‘शिवशक्ती महिला गोविंदा पथक’ आणि ‘हनुमान प्रसन्न खरपेवाडी’ ही निमंत्रित गोविंदा पथके थरांवर थर रचून सलामी देणार आहेत. महिला गोविंदा पथकाचा थरार आणि पथकांमधील चुरस हे यंदाच्या दहीहंडीचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

यंदाच्या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘भव्य रस्सीखेच स्पर्धा’. दहीहंडीच्या दिवशीच, म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ही स्पर्धा सुरू होईल. ‘ताकद एकजुटीची, लढत जोरदार जोशाची’ या ब्रीदवाक्यासह रंगणाऱ्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला ७,७७७ रुपये, द्वितीय क्रमांकास ५,५५५ रुपये आणि तृतीय क्रमांकास ३,३३३ रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने अधिकृत नियमांनुसार खेळवले जाणार असून सहभागी प्रत्येक संघातील १० खेळाडूंना मंडळाकडून टी-शर्ट दिले जाणार आहेत.

ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला आणि गोविंदांच्या उत्साहाला चालना देणाऱ्या या उत्सवामध्ये स्थानिक नागरिक, क्रीडाप्रेमी आणि गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे जाहीर आवाहन पाचल पंचक्रोशी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4763755
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *