लांजा कोत्रेवाडी डम्पिंग ग्राउंड संदर्भात चार दिवसात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार : उपविभागीय अधिकारी विश्वजीत गाताडे यांचे उपोषणकर्त्याना आश्वासन

Gramin Varta
91 Views

लांजा : कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंड संदर्भात पुढील चार दिवसात लांजा मुख्याधिकारी यांना बैठक घ्यायला सांगतो. तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या त्यांच्यासमोर मांडा. त्यानंतर सगळ्या शक्यता तपासून पाहिल्यानंतर फेर तपासणी करण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन उपविभागीय अधिकारी विश्वजीत गाताडे यांनी उपोषणकर्त्या कोत्रेवाडी ग्रामस्थांना दिले.
           
दरम्यान, उपविभागीय अधिकारी यांच्या आश्वासनानंतर कोत्रेवाडी ग्रामस्थांनी शनिवारी रात्री आपले एक दिवसीय लाक्षणिक उपोषण थांबवले. मात्र तहसीलदार तसेच लांजा मुख्याधिकारी यांनी उपोषण कर्त्या ग्रामस्थांची भेट न घेतल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
             
कोत्रेवाडी येथे वस्तीलगत, लांजा नगरपंचायतीने मनमानी कारभार करून,  जोर जबरदस्तीने लादलेला घनकचरा प्रकल्प (डम्पिंग ग्राउंड) रद्द होण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी १५ ऑगस्ट रोजी एक दिवसाचे लक्षण एक उपोषण छेडण्यात  आले होते होते. सकाळपासूनच प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
             
कोणताही अनुचित प्रकार न घडता हे उपोषण लोकशाही पद्धतीने शांततेत सुरू होते. यापूर्वी प्रशासनासोबत झालेल्या बैठकीमध्ये ग्रामस्थांनी कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंड चा प्रस्ताव विद्यमान नगरपंचायत बॉडीने ठराव घालून रद्द करावा आणि तो अन्य ठिकाणी स्थलांतरित करावा तसेच रस्ता नसतानाही तो उपलब्ध करून देऊ असे सांगणाऱ्या जमीन मालकांकडून पैशांची रिकवरी लावावी अशा दोन मागण्या मांडण्यात आल्या होत्या. मात्र त्याबाबत तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता.
              
शनिवारी सकाळी शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर लांजा शहरात ग्रामस्थांच्या उपोषणाला सुरुवात झाली. सायंकाळी उपविभागीय अधिकारी विश्वजीत गाताडे यांनी उपोषणकर्त्या  ग्रामस्थांची भेट घेतली.वयावेळी कोत्रेवाडी ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट करताना नियमबाह्य पद्धतीने हा प्रकल्प कसा लादला जात आहे, नियम कसे पायदळी तुडवले गेले आहेत याचा पाढाच त्यांच्यासमोर मांडला.
          
दरम्यान, कोत्रेवाडी ग्रामस्थांनी छेडलेल्या उपोषणाला जबाबदार अधिकारी म्हणून लांजा तहसीलदार तसेच मुख्याधिकारी यांनी भेट देणे अपेक्षित होते. भले या संदर्भात त्यांच्याकडे उत्तर नसेल. परंतु त्यांनी लोकांची भेट घेण्याचे सौजन्यही दाखवले नाही. त्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी त्यांच्या या भूमिकेबाबत तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली.

Total Visitors :
4710442
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *