लांजा नगरपंचायत वतीने ३ सप्टेंबर रोजी महिलांसाठी विविध स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे आयोजन

Gramin Varta
54 Views

लांजा/अरबाज नेवरेकर : महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने लांजा नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीअंतर्गत विविध स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणामध्ये मेहंदी, लिक्विड, अगरबत्ती, सेंट तसेच स्टॉकिंग फुले बनविणे आदी कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व स्वयंरोजगारासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

हे प्रशिक्षण गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ०४.०० वाजेपर्यंत अजिंक्य मंगल कार्यालय, लांजा येथे आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्याधिकारी अभिजित कुंभार, नगराध्यक्ष सावली कुरूप, उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रणाली तेली आणि उपसभापती प्रांजल यादव यांच्या वतीने या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitors :
4770930
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *