मुंबई : सर्व परीक्षांमध्ये सूसत्रता, पारदर्शकता आणि नियोजित वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठामार्फत प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा वेळेत घेण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.
विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार या परीक्षा १ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहेत. प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या नियमित परीक्षा ५ ते १८ मार्च, तर तृतीय वर्ष सत्र ६ च्या प्रात्यक्षिक परीक्षा १ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत घेण्याची सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना केली आहे.
सर्व परीक्षांमध्ये सूसत्रता, पारदर्शकता आणि नियोजित वेळेत निकाल जाहीर करता यावे, यासाठी मुंबई विद्यापीठाने प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या नियमित परीक्षा ५ मार्च ते १८ मार्च २०२६ या कालावधीत घेण्याची सूचना महाविद्यालयांना केली आहे. तर केटी परीक्षा २० फेब्रुवारी ते ३ मार्च २०२६ दरम्यान घ्याव्या लागणार आहेत. याचबरोबर तृतीत वर्ष सत्र ५ च्या प्रात्यक्षिक परीक्षा २० फेब्रुवारी ते १० मार्च २०२६ या कालावधीत, तर तृतीय वर्ष सत्र ६ च्या प्रात्यक्षिक परीक्षा १ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
तसेच वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान व तंत्रज्ञान आणि मानव्यविज्ञान विद्याशाखांतील विविध अभ्यासक्रमांच्या सत्र ५ केटी परीक्षांचे प्रवेश अर्ज १ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे जमा करावे. तसेच विनाविलंब परीक्षा शुल्क २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत विद्यापीठाकडे जमा करावे. याचबरोबर विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या केटीसह नियमित परीक्षांचे प्रवेश अर्ज भरण्याची सूचना विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे निर्गमित केली आहे.
MSRTC : एसटी महामंडळाचा ‘सुरक्षित प्रवासा’चा संकल्प; राज्यव्यापी सुरक्षितता अभियान…
पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाचे गुण पोर्टलवर सादर करण्याची अंतिम तारीख ३० मार्च २०२६ अशी निश्चित केली आहे. विहित मुदतीनंतर अंतर्गत तथा प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण स्वीकारण्यात येणार नसल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले. सत्र १ ते ४ परीक्षांचे सर्व अंतर्गत, प्रात्यक्षिक तथा सैध्दांतिक परीक्षांचे गुण १० एप्रिल २०२६ पर्यंत विद्यापीठाच्या पोर्टलवर सादर करावे लागणार आहेत.
विज्ञान विद्याशाखेतील सत्र ५ आणि सत्र ६ चे प्रात्यक्षिक आणि अंतर्गत गुण सादर करण्याची अंतिम तारीख ५ एप्रिल २०२६ आहे. सत्र ५ आणि सत्र ६ च्या अप्लाईड कम्पोनेंट विषयांचे अंतर्गत गुण सादर करण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल २०२६ निश्चित करण्यात आली आहे. सर्व संबधित महाविद्यालयांनी अंतर्गत मूल्यांकन विहित कालावधीत करण्याचीही सूचनाही करण्यात आली आहे.
सर्व परीक्षा नियोजित कालावधीत घेऊन निकाल वेळेवर जाहीर करण्याकरीता सर्व संबंधित महाविद्यालयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. सर्व संबंधित महाविद्यालयांनी विहित मुदतीत प्राधान्यांने गुण सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. याकामी कसूर झाल्यास दंडात्मक, तसेच नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. – डॉ. पूजा रौंदळे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ, मुंबई विद्यापीठ.
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा १ ते १८ मार्चदरम्यान; उन्हाळी सत्राचे परीक्षा अर्ज वेळेत सादर करण्याचे आवाहन






