मंत्री उदय सामंत यांची घोषणा;झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवणार
रत्नागिरी: रत्नागिरी शहरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यात येणार असून 1 हजार घरे प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधण्यात येणार आहेत़. साळवी स्टॉप येथील सावंत यांच्या जागेवर हा प्रकल्प उभा करण्याचा संकल्प आह़े. तसेच जिल्ह्यात आवास योजनेची 33 घरे बांधुन पूर्ण केली जातील, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिल़ी.
मंत्री उदय सामंत यांनी रविवारी दृकश्राव्य माध्यमातून पत्रकार परिषद घेतल़ी. शहरातील झोपडपट्टीधारकांची सुमारे 800 घरे असून त्यांना चांगली घरे देण्याचा शासनाचा विचार आह़े. त्यासाठी साळवी स्टॉप येथील सावंत यांच्या जागेमध्ये 1 हजार घरांची उभारणी प्रधानमंत्री आवास योजनेतून केली जाणार आह़े. रत्नागिरी शहर हे झोपडपट्टी मुक्त करण्यात येणार आह़े. तसेच शहरालगतच्या गावामध्ये घनकचरा प्रकल्पही लवकरच उभारले जातील, असे सामंत यांनी यावेळी सांगितल़े.
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेतून 18 हजार 414 घराचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून 18 हजार 505 घरांना मंजुरी देण्यात आली आह़े त्यापैकी 381 घरे पूर्ण झाली असून 15 हजार 323 घरांना पहिला हप्ता देण्यात आला असल्याचे सामंत यांनी सांगितल़े. तसेच 2016-22 मध्ये 9 हजार 615 घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यामधील 9 हजार 572 घरे पूर्ण झाली आहेत़ तर अनुसूचित जातीसाठी 948 व अनुसूचित जमातीची 265 घरे बांधून पूर्ण झाली आहेत़. त्याचप्रमाणे ओबीसी समाजासाठी मोदी आवास योजना राबवण्यात येत असून 6 हजार 356 घरे मंजूर झाली असून त्यापैकी 4 हजार 184 घरे बांधून पूर्ण झाल्याचे सामंत म्हणाले.
रत्नागिरी साळवी स्टॉप येथे प्रधानमंत्री आवास योजनेतून 1 हजार घरे उभारणार
