खेड : तालुक्यातील घाणेखुंट-गवळवाडी येथे शुक्रवारी एका पडीक घरात इब्राहिम उस्मान शेख (देवळेकर) पाटकर (वय 55, मूळगाव – मूरगिरी, पाटण) यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. दोन दिवसांपासून मृतदेह पडून राहिल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खेडमध्ये पडीक घरात कुजलेल्या अवस्थेत प्रौढाचा मृतदेह आढळला
