GRAMIN SEARCH BANNER

आरसीबीची विजयी हॅटट्रिक, जेमिमाच्या दिल्लीचं IPL ट्रॉफीचं स्वप्न यंदाही भंगलं, फायनल मॅचमध्ये स्मृतीचा जलवा

Gramin Varta
107 Views

वडोदरा: महिला प्रीमियर लीग 2026 चा अंतिम सामना आज रंगला. हा फायनल सामन्याचा थरार वडोदरातील कोटंबी स्टेडियमवर रंगला. या सामन्यात Delhi Capitals vs Royal Challengers Bengluru मध्ये रंगला.

या फायनल सामन्याचे नाणेफेक आरसीबीने जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 203 धावा केल्या. याउलट आरसीबीने हा सामना सहा विकेट्सने जिंकला आणि दुसरी ट्रॉफी आपल्या नावावर केली.

महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामाच्या अंतिम सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 204 धावांचे विक्रमी लक्ष्य गाठले आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात, त्यांची कर्णधार स्मृती मानधना आणि जॉर्जिया वॉलने आरसीबीला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 165 धावांची विक्रमी भागीदारी दिसून आली, ज्यामुळे सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. स्मृती मानधना 87 धावा तर जॉर्जिया वॉलने 79 धावा केल्या. आरसीबीने हे लक्ष्य 19.4 चेंडूत पूर्ण केले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शेवटच्या षटकात सामना जिंकला. आरसीबीने हा सामना 6 विकेट्सने जिंकला आणि त्यांचे दुसरे विजेतेपद निश्चित केले. या अंतिम सामन्यात स्मृती मानधना आरसीबीच्या विजयाची स्टार होती. 2023 मध्ये आरसीबीच्या महिला संघाने महिला प्रीमियर लीगमध्ये पहिली ट्रॉफी जिंकली. ही या फ्रँचायझीची पण पहिलीच ट्रॉफी होती. यानंतर पुरुष संघाने 2025 ला तब्बल 18 वर्षानंतर पहिली ट्रॉफी जिंकली. त्यानंतर आता 2026 ला पुन्हा एकदा आरसीबीने ही ट्रॉफी आपल्या नावावर केली. त्यामुळे आरसीबीची ही विजयी हॅटट्रिक आहे असे म्हणू शकतो.

दिल्ली कॅपिटल्सला तब्बल चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचूनही ट्रॉफी जिंकता आली नाही. अंतिम सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 203 धावा केल्या. महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्याच्या इतिहासात कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या होती. आरसीबीने अंतिम सामन्याच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम प्रस्थापित केला.

Total Visitor Counter

3072836
Share This Article