GRAMIN SEARCH BANNER

गुहागर :  बोगस प्रवेश व विद्यार्थाला थेट तिसऱ्या वर्षात प्रवेश दिल्याप्रकरणी खरे-ढेरे महाविद्यालयाला दहा लाखांचा दंड

Gramin Varta
16 Views

गुहागर :  येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील बोगस प्रवेश व बोगस परीक्षा प्रकरणी अखेर महाविद्यालयावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना थेट तिसऱ्या वर्षास बसवून मुंबई विद्यापीठाच्या पदव्या मिळवून देण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून यामुळे राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

या गैरप्रकारांना विरोध केल्यामुळे चार प्राध्यापकांवर जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. आमदार भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित महाविद्यालय दोषी आढळल्याचे स्पष्ट केले.

मुंबई विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीने तीन वेळा महाविद्यालयाची तपासणी करून सखोल चौकशीचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार विद्यापीठाने महाविद्यालयावर दहा लाख रुपयांचा दंड ठोठावून प्रशासक नेमण्याची शिफारस शासनाकडे केली. शासनाने ती मान्य करून डॉ. किरणकुमार बोंदर, सह-संचालक उच्च शिक्षण विभाग, पनवेल यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

प्राध्यापकांवरील हल्ल्यानंतर बुक्टूसह विविध शिक्षक व विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेत दबाव वाढवला होता. सातत्याने झालेल्या पाठपुराव्यानंतर अखेर महाविद्यालयावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3369385
Share This Article