GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या २५०० फेऱ्यांचे नियोजन

Gramin Varta
3 Views

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात येणार असलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी अडीच हजार एसटी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.

येत्या २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार असून या चाकरमानी मोठ्या संख्येने एसटीने कोकणात दाखल होणार आहे. या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी २५०० गाड्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती रत्नागिरीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.

प्रवाशांना ग्रुप बुकिंगची सुविधासुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच तिकीट बुकिंगसाठी रा. प. बसस्थानकावर, खासगी एजंट यांच्यमार्फत किंवा मोबाइल ॲपद्वारे बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणपती परतीच्या वाहतुकीसाठी ११ ऑगस्टपासून आगाऊ आरक्षण सुरू झाले. त्यामुळे बोरिवली, मुंबई, ठाणे, विठ्ठलवाडी, नालासोपारा, विरार, भांडुप, भाईंदर या मार्गावरून आरक्षणाला प्रतिसाद मिळू लागला आहे.

सर्व आगारांतून २३ ऑगस्टपासून ७ सप्टेंबर या कालावधीत बोरिवली, मुंबई, ठाणे, विठ्ठलवाडी, विरार, भांडुप, भाईंदर या मार्गावर बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Total Visitor Counter

2647136
Share This Article