आपल्या देशात आनंद साजरा करण्याचे विविध मार्ग आहेत – पण या नागरिकाने केलेला आनंदोत्सव थेट इतिहासात नोंदवावा, असा प्रकार घडला आहे.
एका नागरिकाने नवी ब्रँड न्यू स्कूटर घेतली. ‘बाईक घेतली म्हणून सेलिब्रेशन करावं’ असं त्यांना वाटल्याने त्यांनी स्कूटरभोवती फटाक्यांची माळ फिरवली. त्यानंतर त्याला कांडी लावली. कांडीने आपल काम केलं आणि फटाक्यांनी आनंद धुळीस मिळवला. “त्यांनी इतके फटाके फोडले की एरव्ही नववर्षही लाजलं असतं. स्कूटरभोवती दोन वेळा लक्ष्मणरेषा काढल्यासारखे फटाके फिरवले, आणि शेवटी नारळ फोडल्यासारखा एक सुतळी बॉम्बही वाजवला.” त्यानंतर केवळ दोन मिनिटात नवीन कोरी स्कुटी जळून खाक झाली.
हा नवीन स्कूटरचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एवढंच नव्हे नीट त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे. त्या मालकाच्या अकलेचे तारे तोडले आहेत.
‘New Bike Vibes’ असं स्टेटस टाकायचं होतं. स्कूटर ही निव्वळ एक इंस्टा रीलसाठी होती. आता ती भंगारात गेली असली, तरी लाईक्स अजूनही मिळत आहेत!”
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चर्चा आणि चेष्टेचा विषय तयार झाला आहे. काहींनी तर “EMI न भरू शकलात तरी ठिणग्या उडवून जा” असा नवीन बाईक घेणाऱ्यांसाठी संदेश लिहून व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवला आहे.
हसावं की रडाव ! नवीन स्कूटर घेतली, गाडीभोवती फटाके फोडले, आणि दोन मिनिटात भंगारात पोचवली!

Leave a Comment