GRAMIN SEARCH BANNER

रामपेठ अंगणवाडीत वार्षिक स्नेहसंमेलन व फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात संपन्न

Gramin Varta
92 Views

संगमेश्वर/ दिनेश आंब्रे: रामपेठ येथील अंगणवाडीमध्ये २१ जानेवारी २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प देवरुख-संगमेश्वरचे प्रकल्प अधिकारी श्री. विनोदकुमार शिंदे उपस्थित होते. तसेच विस्तार अधिकारी श्री. राक्षे सर आणि श्री. देसाई सर यांची देखील प्रमुख उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी सानिका कदम, प्रिया सावंत, विवेक शेरे, खातू गुरुजी, तसेच पत्रकार उदय संसारे, वहाब दळवी, दिपक तुळसणकर, नियाज खान आणि गणेश मंडळाचे सदस्य किशोर पाथरे, पोलीस पाटील अंगराज कोळवणकर यांसह सामाजिक कार्यकर्ते अमृता शेट्ये, दादा कोळवणकर, जनार्दन शिरगावकर, नम्रता शेट्ये आणि ज्येष्ठ नागरिक अर्चना शेट्ये यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.

या स्नेहसंमेलनात मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे परीक्षण श्री. राज्यशेट रेडिज सर यांनी केले. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत चिमुकल्यांनी विविध वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये विठ्ठल-रखुमाईच्या भूमिकेत रुद्र सकपाळ व रसिका सुतार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मृदंगियाच्या भूमिकेत रुही घोडके हिने द्वितीय, तर संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेतील देवांग बोरये याने तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिकामध्ये सावित्रीबाई फुले बनलेल्या गार्गी बेनाडे आणि कांताराची वेशभूषा करणाऱ्या सिद्धांश घोडके यांचा गौरव करण्यात आला.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रोशन शिंदे यांनी नेटकेपणाने केले. या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका पल्लवी शेरे आणि मदतनीस शितल आंब्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित सर्व मान्यवरांनी अंगणवाडीतील मुलांच्या सादरीकरणाचे कौतुक करून कार्यक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या.

Total Visitor Counter

3199515
Share This Article