GRAMIN SEARCH BANNER

सावर्डे विद्यालयात वर्गांतर्गत बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न

Gramin Varta
58 Views

सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे वर्गांतर्गत बुद्धिबळ स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाबद्दलची आवड वाढावी, तर्कशक्ती व निर्णयक्षमता विकसित व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा तीन वेगवेगळ्या गटांमध्ये घेण्यात आली.

या स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कुमार वारे यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना बुद्धिबळ हा मेंदूला चालना देणारा व व्यक्तिमत्त्व विकास साधणारा खेळ असल्याचे सांगितले.

स्पर्धेत विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट शैलीत खेळाचे कौशल्य सादर केले.
स्पर्धेतील विजेते
इयत्ता ५ वी ते ७ वी गट
प्रथम – योगीराज पाकळे
द्वितीय – प्रज्वल सुर्वे
तृतीय – अथर्व बंडगर
इयत्ता ८ वी ते १० वी गट
प्रथम – साई जाधव
द्वितीय – जनक पाटणकर
तृतीय – गंधर्व धने
इयत्ता ११ वी ते १२ वी गट
प्रथम – सोहम गोरीवले
द्वितीय – साईश कांबळे
तृतीय – वेदांत नागम
स्पर्धेच्या समारोप प्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांच्या हस्ते प्रत्येक गटातील विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

बुद्धिबळ स्पर्धेच्या आयोजनासाठी व प्रशिक्षणासाठी क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे व प्रशांत सकपाळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि प्रशासनाचे सहयोग यामुळे बुद्धिबळ स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Total Visitor Counter

3369422
Share This Article