GRAMIN SEARCH BANNER

ध्येयपूर्तीसाठी जिद्दीने प्रयत्न करा : सीए नयन सुर्वे

रत्नागिरीतील फाटक हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

रत्नागिरी : सहकार्यातून ध्येयपूर्तीसाठी जिद्दीने प्रयत्न करा. तुमच्या क्षमता आणि मर्यादा ओळखून परिस्थितीला सामोरे जा. सर्वांसोबत सहकार्याने काम करा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, असे गौरवोद्गार सी. ए. नयन सुर्वे यांनी फाटक हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात काढले. याप्रसंगी व्यासपीठावर दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब परुळेकर, कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे, मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेस जोशी आणि गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.

फाटक हायस्कूल व श्रीमान वि. स. गांगण कला, वाणिज्य आणि कै. त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात एसएससी व एचएससी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापक राजन कीर यांनी शाळेच्या यशाचा आलेख मांडला. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षिका नेहा शेट्ये यांनी केला. २०१३ च्या एसएससी बॅचच्या गुणवंत विद्यार्थिनी आणि सीए परीक्षेत महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक प्राप्त माजी विद्यार्थिनी नयन सुर्वे यांचा याप्रसंगी अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एसएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी  हरिहर करमरकर –  ९९.६० %,  आर्यन कुंभार – ९९ %, आर्या कुंभार –  ९७.६०%,  आदिती फडके –  ९७.६० %, गार्गी करमरकर – ९७.४०%,  विश्वराज यादव –  ९७.४०%,  नीरजा कडवेकर –  ९७.२०% या प्रथम पाच क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांसह विविध विषय व तुकड्यांतील प्रथम क्रमांकांना तसेच  ८९% पेक्षा अधिक गुण प्राप्त ४१ गुणवंतांना रोख रक्कम व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सत्कार समारंभासाठी विविध देणगीदारांनी संस्थेकडे ठेवलेल्या देणगीचे व्याज, विद्यार्थी कल्याण निधी, एसएससी बॅच, माजी कर्मचारी यांच्याकडून ५४ विद्यार्थ्यांना ४२ हजार ८५०ची रोख रक्कम आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. बारावी परीक्षेतील कला शाखेतील मुक्ता गावडे – ८३.८३ %, श्रेया कुरधुंडकर – ७२.२० %, वृणाली शिवलकर – ७२ %, वाणिज्य शाखेतील वेदिका गोलिवडेकर- ९२.१७ %, रुची तेरवणकर- ८४.५० %, शर्वरी शेंबेकर-  ८२.६७ % विज्ञान शाखेतील अबान मुजावर- ८५.३३%, वाघेश्वरी  कुलकर्णी- ८५ %, वैभवी जामनेकर -८४ % असे अनुक्रमे तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी मंजिरी आगाशे , दिनेश नाचणकर, अनंत जाधव, राजाराम पानगले या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.      

शाळेचे ऋण विसरू शकत नाही, असे सत्कारला उत्तर देताना हरिहर करमरकरने सांगितले. शाळेबद्दलची कृतज्ञता विभावरी करमरकर आणि विशाखा गोलीवडेकर या पालकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. गुणवंत विद्यार्थी व  शिक्षकांचे अभिनंदन करत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखण्याचे आवाहन अध्यक्षीय मनोगतातून बाबासाहेब परुळेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार विश्वेश जोशी यांनी मानले. सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन वृषाली दळी आणि आरती पाथरे यांनी केले.

Total Visitor Counter

2474801
Share This Article