GRAMIN SEARCH BANNER

लांजा: इमारतीच्या कामावेळी लादी डोक्यात पडून तरुण जखमी

Gramin Search
25 Views

लांजा : तालुक्यातील वेरवली येथे इमारतीचे काम सुरू असताना अचानक डोक्यात लादी पडल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. राजू गांचू दुर्वे (२९, रा. राजापूर, मूळ मध्य प्रदेश) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू दुर्वे हा वेरवली येथील एका इमारतीच्या बांधकामावर काम करत होता. काम सुरू असताना अचानक त्याच्या डोक्यावर लादी कोसळली, ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3376740
Share This Article