GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणातील भीषण अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी

Gramin Varta
507 Views

चिपळूण : चिपळूण-कराड मार्गावरील सती येथे शुक्रवारी सायंकाळी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये वेहेळे येथील सुप्रसिद्ध कबड्डीपटू सागर विजय गमरे (वय २६) याचा समावेश असून त्याला अधिक उपचारासाठी कराड येथे हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर गमरे हा वेहेळे येथून दुचाकीने चिपळूण बाजारपेठेच्या दिशेने येत असताना सती परिसरात समोरून येणाऱ्या पाटील नामक व्यक्तीच्या दुचाकीला त्याची मोटारसायकल धडकली. या भीषण धडकेत दोघेही रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले.

सागर गमरे याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी कराड येथे हलवण्यात आले आहे. सागर हा वेहेळे गावातील सुपरिचित कबड्डीपटू असून ‘भीम संघर्ष वेहेळे’ या स्थानिक संघातून तो खेळतो. अपघाताची नोंद अद्याप चिपळूण पोलीस ठाण्यात झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे.

Total Visitor Counter

3366971
Share This Article