GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये ३० वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू

Gramin Varta
132 Views

खेड : खेड तालुक्यातील कळंबणी परिसरात अज्ञात सुमारे ३० वर्षीय तरुणास अचानक फिट येऊन तो खाली कोसळून डोक्यावर आदळल्याची घटना घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

प्राथमिक उपचारासाठी त्याला तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून, याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत असून, मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Total Visitor Counter

3370003
Share This Article