श्रीवर्धन/ संदीप लाड:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीवर्धन येथे भारतीय जनता पार्टी तालुका श्रीवर्धन यांच्या वतीने एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. मंगळवार, २२ जुलै २०२५ रोजी उपजिल्हा रुग्णालयात सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर पार पडले.
पावसाळ्यात विविध ठिकाणी रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीवर्धन तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. रक्तसंकलनाची जबाबदारी नवी मुंबई ब्लड सेंटर, खारघर यांनी पार पाडली.
शिबिर प्रसंगी दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस प्रशांत शिंदे, माजी नगरसेवक वसंत यादव, तालुका अध्यक्ष आशुतोष पाटील, तालुका चिटणीस वासुदेव सानप, उपाध्यक्ष संतोष पारधी, तालुका सरचिटणीस उमेश अडखले, गणाध्यक्ष तुषार विचारे, युवा मोर्चाचे प्रणय पेडणेकर, राजेंद्र तोडणकर, विलास पाटील, संदीप गोरीवले, अन्वर उंद्रे, महिला शहर अध्यक्षा सुप्रिया चोगले, रविना गुरव तसेच युवा कार्यकर्ते निलेश खेडेकर व प्रणील बोरकर यांच्यासह सर्व बूथ अध्यक्ष, शक्तीप्रमुख, ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमातून रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यास अधिक गती मिळाली असून, वाढदिवस साजरा करण्याचा हा विधायक आणि अनुकरणीय मार्ग ठरला आहे.