GRAMIN SEARCH BANNER

देवरुख भायजेवाडीतील ‘शिंद्यांचा राजाची’ सजावट ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू

Gramin Varta
38 Views

संगमेश्वर : तालुक्यातील देवरुख, भायजेवाडी मधील शांताराम, रामचंद्र, विनायक व संतोष शिंदे बंधूंचा गणपती बाप्पा म्हणजे ”शिंद्यांचा राजा’. प्रतिवर्षी  ‘शिंद्यांचा राजाची’ प्रतिष्ठापना श्री गणेश चतुर्थीला होते आणि अनंत चतुर्दशीपर्यंत हा गणेशोत्सव सुरू असतो. प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण सजावट हे या बाप्पाचे वैशिष्ट्य असते, शिंदे कुटुंबातील तीन पिढ्यातील सर्व लहानथोर मंडळी स्वतः ही आकर्षक सजावट गेली अनेक वर्ष करत आहेत.

यावर्षीची सजावटही दरवर्षाप्रमाणे आकर्षक असून यामध्ये विविध प्रकारची रंगीत कापड व कागद, विविध प्रकारची फुले व पाने आणि आकर्षक लाईटचा वापर करण्यात आलेला आहे.  गणेशोत्सवाच्या या १० दिवसात आरत्या, भजन तसेच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम यांची रेलचेल याठिकाणी असते. शिंदे परिवारातील विविध सदस्य नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी असले तरी गणेशोत्सव व इतर पारंपारिक सणाला एकत्र येऊन मोठ्या आनंदाने सण व उत्सव साजरे करतात. शिंदे कुटुंबाकडे पाहिल्यानंतर या आधुनिक काळातही एकत्र कुटुंब पद्धतीची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे निदर्शनास येते.

Total Visitor Counter

3366944
Share This Article