राजापूर : तालुक्यातील कोदवली गुरववाडी येथील ४३ वर्षीय महिलेचा रविवारी (दि. २० जुलै ) सकाळी अचानक चक्कर येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या महिलेचे नाव अर्पिता श्रीपत गुरव असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्पिता यांना रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या. यानंतर त्यांचे पती जितेंद्र गुरव यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केलं.
या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात अकास्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
राजापूर : कोदवली येथील महिलेचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू
