देवरुख : पोटदुखीच्या उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या संगमेश्वर तालुक्यातील एका ६३ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुदेश सावजी बाहुल (वय ६३, रा. दाभोळे, बाहुलवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची नोंद देवरूख पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुदेश बाहुल यांना गेल्या एक महिन्यापासून पोटदुखीचा त्रास होत होता. त्यांच्या मुलाने (खबर देणाऱ्याने) त्यांना उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना डिस्चार्ज दिला.
मात्र, ५ ऑगस्ट रोजी पहाटे पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना पुन्हा केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, २५ ऑगस्ट रोजी पहाटे ४.१८ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर देवरूख पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून, आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
संगमेश्वरच्या वृद्धाचा उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू
