GRAMIN SEARCH BANNER

खेड: नातुनगर मोहल्यातील तरुणाचा मुंबईत लोकलमधून पडून मृत्यू

खेड : तालुक्यातील नातूनगर-मोहल्ला येथील रहिवासी व मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या नौशाद नूरमोहम्मद कोंडेकर (२२) याचा मुंबई येथील मस्जिद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान लोकल रेल्वेतून पडून मृत्यू झाला. यामुळे कोंडेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नूर मोहम्मद कोंडेकर यांचा तो एकुलता एक मुलगा होता. लोकल रेल्वेतून प्रवास करत असताना तोल जाऊन तो खाली पडला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

शनिवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह मूळगावी खेड तालुक्यात नातूनगर येथे आणण्यात आला. शनिवारी नातूनगर-मोहल्ला येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेने नातूनगरसह खवटी, तुळशी पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

2475257
Share This Article