GRAMIN SEARCH BANNER

खालिद जमील यांची २०२७ पर्यंत भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती

दिल्ली: अखिल भारतीय फुटबॉल महासंघानने खालिद जमील यांची भारतीय वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. जमील यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे.

ज्यामध्ये आणखी एक वर्ष वाढवण्याचा पर्याय देखील समाविष्ट केला आहे.

जमील राष्ट्रीय संघासोबत पूर्णवेळ काम करतील आणि १५ ऑगस्टपासून बंगळुरू येथील द्रविड-पडुकोण सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलन्स येथे त्यांचे पहिले प्रशिक्षण शिबिर सुरू करतील. संभाव्य फुटबॉलपटूंची यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ पहिली स्पर्धा नेशन्स कप खेळणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा सामना २९ ऑगस्ट रोजी यजमान ताजिकिस्तानशी, १ सप्टेंबरला इराण आणि ४ सप्टेंबला अफगाणिस्तानशी होणार आहे. तर भारतीय संघ सिंगापूर विरुद्ध एएफसी आशियाई कप २०२७ च्या दोन महत्त्वाच्या पात्रता सामने ९ आणि १४ ऑक्टोबर खेळणार आहे.

२०१२ मध्ये सावियो मेडेइरा यांच्यानंतर ही जबाबदारी सांभाळणारे पहिले भारतीय असलेले जमील म्हणाले, आमच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचा मला खूप अभिमान आहे. भारतीय फुटबॉलपटूंसोबतच्या माझ्या गेल्या काही वर्षांच्या अनुभवामुळे मला त्यांच्या ताकदी आणि कमकुवतपणाबद्दल मौल्यवान माहिती मिळाली आहे, जी आमच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल.

खालिद जमिल यांनी जमशेदपूर एफसी, नॉर्थईस्ट युनायटेड एफसी, ऐझॉल एफसी, ईस्ट बंगाल एफसी, मोहन बागान एसी आणि मुंबई एफसी यासह अनेक आय-लीग आणि आयएसएल क्लबचे व्यवस्थापन केले आहे. त्यांनी २०१६-१७ मध्ये ऐझॉल एफसीला आय-लीग जेतेपद मिळवून दिले होते.

माजी भारतीय आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू जमीलने १९९७ च्या एसएएफएफ चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण केले. आणि २००२ च्या फिफा विश्वचषक पात्रता आणि २००१ च्या मर्डेका स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होता. क्लब पातळीवर त्यांनी महिंद्रा युनायटेडसोबत नॅशनल फुटबॉल लीग, दोन फेडरेशन कप आणि दोन आयएफए शिल्ड जिंकले होते.

Total Visitor Counter

2475126
Share This Article