चिपळूण – क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने एस. व्ही. जे. सी. टी.डेरवण येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सह्याद्रि शिक्षण संस्था सावर्डे संचलित ह. भ. प. आ. बा. सावंत माध्यमिक विद्यालय तोंडली पिलवली विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी रिया कांबळे इयत्ता आठवी हिने 14 वर्षे वयोगटामध्ये थाळीफेक या स्पर्धा प्रकारामध्ये चिपळूण तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
या विद्यार्थिनीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली तिच्या या यशाबद्दल विद्यालयाचे चेअरमन श्री. दिपक सावंत तसेच सर्व स्कूल कमिटी सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. म्हस्के सर शिक्षक वृंद श्री. पाकळे सर, सौ .पाकळे मॅडम शिक्षकेतर कर्मचारी श्री. कोकमकर श्री. नेताजी पाटील व गुरव यांनी अभिनंदन केले . विद्यालयातर्फे 14 व17वर्षे वयोगटांमध्ये विविध स्पर्धा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री.पाकळे सर यांनी मार्गदर्शन केले.