राजापूर : तालुक्यातील जानशी धनावडेवाडी येथे राहणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणाने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अरविंद सूर्यकांत धनावडे असे या मृत तरुणाचे नाव असून, त्याची पत्नी गेल्या सहा महिन्यांपासून माहेरी गेल्याने तो मानसिक तणावाखाली होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची नोंद राजापूर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद धनावडे यांनी २७ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० ते २८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०० या वेळेत आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेतला. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, त्यांच्या पत्नी अल्पिता अरविंद धनावडे मुलाबाळांसह सहा महिन्यांपासून माहेरी गेल्या होत्या आणि परत येत नव्हत्या, त्यामुळे तो प्रचंड तणावाखाली होता असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या घटनेमुळे धनावडेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राजापूर : पत्नी माहेरी गेल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
