मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणारी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेतर्फे होणारी यूजीसी नेट या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षा एकाच दिवशी म्हणजेच दि.4 जानेवारी 2026 रोजी आल्याने हजारो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.वर्षभर दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांपुढे आता कोणती परीक्षा निवडावी, वर्षभराच्या मेहनतीवर पाणी?
असा प्रश्न निर्माण झाला आहे. एमपीएससीने गट-क पूर्व परीक्षेची मूळ तारीख दि.30 नोव्हेंबर यूपीएससी परीक्षेमुळे पुढे ढकलून दि. 4 जानेवारी ही नवी तारीख निश्चित केली. मात्र, याच कालावधीत दि.31 डिसेंबर ते 7 जानेवारी) एनटीएने यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
एमपीएससी-नेट परिक्षा एकाच दिवशी आल्याने संभ्रम
