रत्नागिरी: भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडळाच्या वतीने मोदी सरकारच्या यशस्वी अकरा वर्षांच्या पूर्णत्वानिमित्त विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षांत देशभरात राबविण्यात आलेली विविध विकासकामे, लोककल्याणकारी योजना, सुशासन व प्रशासनातील क्रांतिकारी बदल याबद्दल या कार्यक्रमात माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी केले. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तर महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राजेश आयरे यांनी मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळातील काही महत्त्वाच्या योजनांची माहिती दिली. त्यात प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, जल जीवन मिशन, वंदे भारत एक्स्प्रेस यांसारख्या योजनांची माहिती देत या योजनांनी भारतात कसा सकारात्मक बदल घडवला, हे उलगडून सांगितले.
मोदी सरकारच्या विकासाच्या संकल्पनेची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे व देशहितासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्याचा आढावा घेणे हे कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते.
कार्यक्रमाला भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप सुर्वे, नीलेश आखाडे, अमित विलणकर, नितीन जाधव, गुरुप्रसाद फाटक, तुषार देसाई, सचिन गांधी, बबलू विलणकर, वैभवी शिवलकर, मुकुंद विलणकर, समीर वस्ता, प्रणाली रायकर, शैलू बेर्डे, प्रवीण रायकर, भक्ती दळी, सायली बेर्डे, सानिका शर्मा, अमेय घुडे, कमलाकर जोशी यांच्यासह अनेक महिला व युवक कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते.
मोदी सरकारच्या यशस्वी अकरा वर्षांच्या निमित्ताने रत्नागिरीत भव्य मार्गदर्शन कार्यक्रम

Leave a Comment