GRAMIN SEARCH BANNER

घरे फोडली चार, भंबेरी उडाली फार,
हातात काही नाही, तरी चेहरा मात्र कॅमेऱ्यात आरपार!

घर फोडायला आला, रेनकोट घेऊन पळाला

चिपळुणात चोरट्यांची दयनीय अवस्था

चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चोऱ्यांचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. रविवारी रात्री मुंबई-गोवा महामार्गालगतच्या कापसाळ-दुकानखोरी परिसरात एका रात्रीत चार बंद घरे फोडण्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या घरफोड्यांमध्ये कोणताही मौल्यवान मुद्देमाल चोरीस गेला नसला, तरी चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त टाकले असून चोरीचा स्पष्ट प्रयत्न केला आहे.

सकाळी नागरिकांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, या चोरीप्रकरणी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नव्हती.

याआधी शहरातील राधाकृष्ण नगर, खेड आणि बायपास रोड परिसरात १५हून अधिक घरफोड्यांच्या घटना घडल्या असून, त्या प्रकरणांमध्ये ठराविक रकमेचा व मौल्यवान वस्तूंचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. पोलीस तपास सुरू असतानाच चोरट्यांनी आता शहराबाहेरील ग्रामीण भागांमध्येही लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.

या नव्या घटनेत चोरी करताना दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहेत. फुटेजमध्ये हे चोरटे घराबाहेर शांतपणे वावरताना दिसत असून, त्यांनी परिसराची पूर्वतयारीने पाहणी केल्याचे सूचित होते.

या घटना लक्षात घेता, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामीण भागातही पोलिसांचे गस्त वाढवावी व चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावावा, अशी मागणी होत आहे.

Total Visitor

0214206
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *