कुडाळ : धो धो पाऊस कोसळत असतानाच कुडाळ तालुक्यातील अणाव-पालववाडी येथील मुंबईस्थित नारायण पालव यांच्या घराच्या किचनमध्ये अचानक आग लागली. नजीकच्या ग्रामस्थांच्या आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी धावाधाव करीत आग विझविली.
यात घराचे सुमारे 40 हजार रूपयांचे नुकसान झाले. ही घटना गुरूवारी सकाळी 10.30 वा. च्या सुमारास घडली. शॉट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. आग लागल्याचे शेजारील ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच लागलीच धाव घेत साहित्य बाहेर काढून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.
तालुक्यात गुरूवारी धुवाँधार पाऊस कोसळत होता. त्याचवेळी श्री.पालव यांच्या घरातून आगीचा धूर येत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी तेथे धाव घेत आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. घराच्या किचनमध्ये आग लागली होती. या आगीत घरातील वॉशिंग मशीन, छप्पराचा काही भाग तसेच अन्य साहित्य जळून नुकसान झाले. हे घर बंद असून पालव कुटुंबिय मुंबईला वास्तव्यास असतात.
मात्र, शेजारील ग्रामस्थांनी आग लागल्याचे लक्षात येताच घरातील साहित्य बाहेर काढले वआगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्यामुळे अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अणाव सरपंच लिलाधर अणावकर, उपसरपंच आदिती अणावकर, ओरोस पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. लव्हे, पोलिसपाटील, कोतवाल आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
धो..धो पावसात बंद घराला आग!

Leave a Comment