चिपळूण: रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात अग्रस्थानी असणाऱ्या चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन च्या अध्यक्षपदी पिंपळी येथील सुप्रसिद्ध जनरल प्रॅक्टिशनर डॉ. संदीप भागवत यांची एक मताने निवड .कुशल संघटक, वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ठ व जाणकार अशी त्याची ख्याती आहे.
हॉटेल अतिथी ग्रँड येथे नुकत्याच पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. असोसिएशनच्या सेक्रेटरी पदी चिपळूण येथील डॉ.ओंकार बेल्लारीकर, खजिनदार पदी पिंपळी येथील डॉ. अभिजीत दुधाळ, महिला प्रतिनिधी शिरगाव येथील डॉ.स्नेहल जोशी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
या पदग्रहण सोहळ्यामध्ये, डॉ.संदीप भागवत यांनी आपल्या भाषणात संघटनेची धोरणे व उद्दिष्टे स्पष्ट केली. डॉक्टरांसाठी नवीन उपचार पद्धतीवर कार्यशाळा, याबाबत माहिती दिली.तसेच चिपळूण व परिसरामध्ये उद्भवणाऱ्या आपत्तींवर सीजीपीए डॉक्टरांची “डिझास्टर क्विक रिस्पॉन्स टीम” बनविण्याबद्दल संकल्प केला. संघटनेची ओळख केवळ व्यावसायिक पातळीवर न राहता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. विविध सामाजिक , शैक्षणिक, सांस्कृतिक व आरोग्य विषयक , जनजागृती करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
संघटनेचे सेक्रेटरी डॉ.ओंकार बेल्लारीकर यांनी सर्व डॉक्टर्सना संघटनेच्या कार्यामध्ये उपस्थिती दाखवून सहकार्य करण्याचे आवाहन केले. डॉ.अभिजीत दुधाळ यांनी संघटनेच्या कामासाठी कायम कटिबद्ध असल्याचे सांगितले. डॉ.स्नेहल जोशी, महिला प्रतिनिधी यांनी महिला डॉक्टरांच्या उत्स्फूर्त व समाजातील वंचित घटकातील महिलांसाठी विशेष आरोग्य विषयक कार्यक्रम आयोजनाची ग्वाही दिली. संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. रणजीत पाटील,डॉ.अरुण पाटील, डॉ.ऋषिकेश चितळे हे सल्लागार निवड करण्यात आली. आहेत. कमिटीच्या वतीने डॉ.मंगेश वाजे यांनी दिवाळी “स्वर संध्या ” या कार्यक्रमाची घोषणा केली.
पदग्रहण सोहळ्यानंतर रुबी हॉल क्लिनिक,पुणे येथील सुप्रसिद्ध ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. मनोज श्रीवास्तव आणि व्हॅस्क्युलर, इंडोवेस्क्युलर सर्जन डॉ.अनिल राणे, यांनी डॉक्टर्सना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात गत वर्षीच्या डॉ.जलश्री चाळके व त्यांच्या कमिटीचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला डॉ. अजित दाभोळकर, डॉ.एस आर पाटील, डॉ टी.पी
पाटील ,डॉ.संतोष दाभोळकर, डॉ. राकेश चाळके,डॉ.सुभाष उतेकर,डॉ.अल्ताफ सरगूरोह, डॉ. कृष्णकांत पाटील,डॉ.विकास मिर्लेकर, डॉ. जोगळेकर, डॉ. अनिल शिगवण,डॉ. अभिजीत सावंत, डॉ.प्रसाद खातू, डॉ समीद चिकटे,डॉ नियाज पाते, डॉ .संदीप दाभोळकर, डॉ.चेतन पाटील, डॉ.संतोष पाटील, डॉ. दीपक विखारे ,डॉ. संजय कलगुटकी, डॉ. प्रसाद दळी, डॉ विशाल पेटकर डॉ.यतीन मयेकर,डॉ. ज्ञानेश्वर खांबे,डॉ.उमेश खेडेकर,चिपळूण होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन चे अध्यक्ष डॉ निरंजन तांबे, चिपळूण निमा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.चैतन्य खोत, तसेच चिपळूण आणि परिसरातील बहुसंख्य डॉक्टर्स आणि महिला
डॉक्टर्स उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.ऋषिकेश चितळे व डॉ सुविधा बेल्लारीकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले.
कार्यक्रमाचे सांगता स्नेहभोजनाने झाली.
नवीन अध्यक्षांच्या निवडीबद्दल समाजातील विविध मान्यवरांनी डॉ भागवत यांना शुभेच्छा दिल्या! डॉ .भागवत यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचा यशाची एक वेगळी नवी उंची गाठेल .संस्थेच्या प्रगतीसाठी नवे विचार, नवा उत्साह आणि नव्या अध्यक्षांचे एक उत्तम नेतृत्व मिळाले आहे .कार्यक्रमाचे आभार अलोरे येथील डॉ रणजीत पाटील यांनी व्यक्त केले.