GRAMIN SEARCH BANNER

खंडाळ्यात विजेचा खांब कोसळून वाहतूक ठप्प

खंडाळा: आज संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सुटलेल्या वाऱ्यामुळे खंडाळा-जयगड रस्त्यावर श्री बाबूशेठ पाटील यांच्या कार्यालयाजवळ महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा एक वीज खांब अचानक कोसळला. यामुळे समोरच्या बाजूच्या वीजवाहिन्या रस्त्यात आडव्या पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे थांबली आणि मोठी कोंडी निर्माण झाली. रस्त्याच्या मधोमध पडलेल्या तारांमुळे रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

या घटनेमुळे केवळ वाहतुकीची कोंडी झाली नाही, तर परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला आहे, ज्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सुदैवाने, ज्यावेळी खांब आणि तारा कोसळल्या, त्यावेळी रस्त्यावर कोणतेही मनुष्य किंवा वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा, गंभीर अपघात होण्याची शक्यता होती.
ग्रामस्थांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. निकृष्ट दर्जाचे खांब आणि कामामुळेच अशा घटना घडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वाऱ्याच्या सामान्य वेगातही खांब कोसळत असल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळा च्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळा ला लवकरात लवकर परिसरातील सर्व निकृष्ट दर्जाचे वीज खांब बदलण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करता येईल.

Total Visitor Counter

2455606
Share This Article