संगमेश्वर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ ग्रामपंचायत तीला नवीन घंटा गाडी मिळाली असून आता कचऱ्याचे नियोजन करणे सोपे होणार आहे.तुरळ ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ अंतर्गत नागरी सुविधा योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीला मिळालेल्या नव्या घंटागाडीचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले
या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सहदेव सुवरे, उपसरपंच श्री. अनंत पाचकले, ग्रामपंचायत सदस्य श्री. रामचंद्र हारेकर, श्री. विनायक गुरव, तसेच राजेंद्र सुर्वे साहेब, कृष्णाजी हरेकर माजी सरपंच मा. श्री. अरविंद जाधव साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष मा. श्री. संतोष जाधव पोलीस पाटील श्री. संजय ओकटे व ग्रामस्थ श्री. सुरेश पवार, चंद्रकांत तुरळकर, नंदकुमार फडकले, मुकुंद गुरव, उदय मोहिते आदी उपस्थित होते.
घंटागाडीमुळे गावात स्वच्छतेबाबत सुविधा अधिक सक्षम होणार असून, कचरा संकलनाची प्रक्रिया अधिक नियमित व कार्यक्षम होणार आहे. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे स्वागत करत अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे संयोजन ग्रामपंचायत प्रशासनाने केले असून, ग्रामविकासाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
संगमेश्वरमधील तुरळ ग्रामपंचायतीस नवीन घंटागाडी
