संगमेश्वर : तालुक्यातील निर्मल ग्राम पंचायत नांदळज गावाच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अशोक तुकाराम कांबळे यांची एकमताने निवड झाली आहे . त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
निर्मल ग्राम पंचायत नांदळज, गावाच्या ग्रामसभेची बैठक शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी जेष्ठ ग्रामस्थ दिलीप गोवळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सदर बैठकीला सरपंच विनोद गोविंद कांबळे, तसेच उप सरपंच व सदस्य कृष्णा बावधने यांसह, य पोलिस पाटील संतोष घाटले आणि गावचे मुख्य मानकरी जयराम रहाटे , अजित कांबळे आदी उपस्थित होते.नांदळज गावचे सुपुत्र,बौद्धवाडीतील ज्येष्ठ नागरिक, बौद्धचार्य, प्रबोधनकार, अशोक तुकाराम कांबळे हे संगमेश्वर तालुका आंबेडकरी चळवळीत काम करीत असल्याचे सांगून त्यांची निवड कशी योग्य आहे हे उपस्थित ग्रामस्थांना अजित कांबळे यांनी दिले.अशोक तुकाराम कांबळे यांची नांदळज तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष करण्यात यावे अशी सूचना केली.
यावेळी माजी सरपंच मान.संजय सुवारे, साथी विलास गोवलकर, गावचे मानकरी केशव डोंगरे मान.सुभाष गोवळकर, श्री प्रकाश राणे, गणपत बोथले, हिरु पाध्ये तसेच गावातील जेष्ठ ग्रामस्थ यांनी अशोक कांबळे यांच्या निवडीची सूचना मांडली . सूचनेनुसार निर्मल ग्राम पंचायत नांदळज या गावाच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अशोक तुकाराम कांबळे यांची एक मताने निवड करण्यात आली. त्यानंतर अध्यक्ष पद स्वीकारताना नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक तुकाराम कांबळे यांनी ग्रामस्थांसहीत , ग्राम पंचायत नांदळजचे सदस्य, श्री सुखाई ग्रामस्त मंडळ, मौजे नांदळज बौद्धजन संघटन मंडळ मुंबई व ग्रामीण , भारतीय बौद्ध महासभा शाखा नांदळज, माता रमाई महिला मंडळ, व ग्रामस्थ यांचे मनःपूर्वक आभार मानले.
गावात कोणतेही तंटे होणार नाहीत याच्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे गावकऱ्यांना आवाहन केले . अशोक तुकाराम कांबळे यांच्या निवडीने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून संगमेश्वर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना व कार्यकर्ते यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ,(आठवले) या पक्षाचे उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष ,समाजभूषण प्रकाश कमलाकर जाधव यांनी अशोक तुकाराम कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.