GRAMIN SEARCH BANNER

जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेसाठी संगमेश्वरच्या तायक्वांदो पटूची निवड

Gramin Varta
20 Views

संगमेश्वर: रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने व तायक्वांदो स्पोर्ट ॲकॅडमी चिपळूण तालुकाच्या सहकार्याने २३ वी सब-जुनियर व ज्युनिअर व ८ वी कॅडेट,२३ वी सिनियर क्युरोगी व १२ वी सब-जुनियर,८ वी कॅडेट,१२ वी ज्युनिअर व सिनियर पुमसे तायक्वांदो स्पर्धा सन २०२५ पुष्कर,स्वामी मंगल हॉल,बहादुरशेख नका, तालुका चिपळूण,या ठिकाणी दिनांक २ ते ४ ऑगस्ट २०२५ दरम्यान संपन्न होत असून जिल्ह्यातून सुमारे 600 खेळाडू सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेसाठी संगेमश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमीच्या अंतर्गत सुरू असलेले नगरपंचायत देवरूख तायक्वांदो क्लब व निवे तायक्वांदो क्लब व लायन्स क्लब संगमेश्वर चे खेळाडू सहभागी होणार असून या खेळाडूंची निवड चाचणी नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब दळवी वृंदावन कंपाऊंड देवरुख या ठिकाणी घेण्यात आली.

निवड झालेले खेळाडू संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार असून त्यांच्या छोटेखानी शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब देवरुख या ठिकाणी नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले, नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब अध्यक्षा सौ. स्मिता लाड. प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, उपाध्यक्षा ॲड.सौ.पूनम चव्हाण, उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सुु आर्ते, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड,सदस्या रुपाली कदम, पालक प्रतिनिधी आदिती लोध यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

स्पर्धेत निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे
शौर्य माळी, ऋतिक कांगणे, अबिर शेट्ये, सोमांश सावंत, प्रथमेश कारेकर, वेदांत मसुरकर, यश जाधव, सुमित पवार, आषिश रसाळ, साहिल घडशी,प्रणित कांबळे, गंधर्व शेट्ये, ओम घाग, प्रथमेश शेट्ये, मंथन चव्हाण, सोहम मालगुंडकर, आराध्य कुष्टे , वेद पटेल, अजिंक्य शिंदे,लक्ष्मी मोघे, दुर्गा मोघे, यशराज कटके, पृथ्वीराज कटके,साहिल जागुष्टे, सोनल शिंदे,पूर्वा वनकर, तनुश्री नारकर, सान्वी जागुष्टे, वेदांत म्हसुरकर, शर्विल कांगणे, तनिष्का कांगणे, स्वानंदी कांगणे, कृष्णा गवाणकर, जीविता देशपांडे, सई संसारे, कौस्तुभ बोटके, कियान वी, रेयांश वी, ईशान भागवत, मल्हार साने मृणाल मोहरे, सेजल बावधने, अफजान फुलारी, अधिराज कदम, हृदया कदम, सान्वी रसाळ, श्रावणी ईप्त्ये, ऋतिक रसाळ, विदिशा जाधव, मृणाल जाधव, आर्या ईप्त्ये हे सर्व खेळाडू संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार असून प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, स्वप्निल दांडेकर, साईप्रसाद शिंदे,सुमित पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

या निवड झालेल्या खेळाडूंना तालुका अकॅडमी अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाष बने तालुक्याचे आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, देवरुख शहराच्या माजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, देवरुख शहराचे माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये व जिल्हा संघटना अध्यक्ष व राज्य संघटना खजिनदार व्यंकटेश्वरराव कर्रा, तालुका अकॅडमीचे उपाध्यक्ष परेश खातू, टेक्निकल प्रमुख चिन्मय साने,क्लब सदस्य अण्णा बेर्डे, दत्तात्रय भस्मे, अनुजा नार्वेकर, स्वाती नारकर, सिनियर खेळाडू सौरभ वनकर, निखिल लाड, संकेत मापुस्कर, सानिका प्रसादे, गायत्री शिंदे,सिद्धी केदारी, वेदांत गिडीये आदींनी शुभेच्छा दिल्या.

Total Visitor Counter

3369243
Share This Article