GRAMIN SEARCH BANNER

राजापुरात हळहळ : सर्पदंशाने ९ वर्षीय मुलाचा मृत्यू; देवीहसोळ गावात शोककळा

Gramin Varta
16 Views

राजापूर : तालुक्यातील देवीहसोळ येथे सर्पदंशामुळे ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. श्रवण विकास भोवड असे या मुलाचे नाव असून, या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवीहसोळ-लिंगवाडीतील विकास भोवड यांचा मुलगा श्रवण याला सर्पदंश झाला होता. मात्र सुरुवातीला सर्पदंश झाल्याचे लक्षात आले नाही, त्यामुळे उपचार सुरू होण्यास विलंब झाला. काही वेळानंतर त्याची प्रकृती बिघडू लागल्याने कुटुंबीयांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तपासणीत सर्पदंश झाल्याचे स्पष्ट झाले.

डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात श्रवणवर उपचार सुरू केले; त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. मात्र, शुक्रवारी (८ ऑगस्ट) पहाटे त्याची प्राणज्योत मालवली.

मनमिळावू, शांत आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या श्रवणच्या निधनाने देवीहसोळ गावात शोककळा पसरली आहे.

Total Visitor Counter

2652219
Share This Article