संगमेश्वर : तेर्ये येथील युवा कोकण उद्योजक सुनील गेल्ये यांच्या निवासस्थानी यंदाही गणेशोत्सव पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
उत्सवाच्या निमित्ताने सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील नागरिक, कुटुंबीय व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूजनानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
विशेष आकर्षण ठरले ते आयोजित केलेले “मित्र परिवार स्नेहमेळावा”. या स्नेहमेळाव्यात विविध शैक्षणिक व सामाजिक विषयांवर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. नवउद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. गावातील युवकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गणेशोत्सवाचे निमित्त साधून सामाजिक एकोप्याचा आणि विचारमंथनाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. सुनील गेल्ये यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गणपती उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संवाद आणि एकत्रिततेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाचा उत्सवही त्याचा एक उत्कृष्ट नमुना ठरला.
गणेशोत्सवानिमित्त तेऱ्ये येथील युवा उद्योजक सुनील गेल्ये यांच्या बाप्पाचे विसर्जन
