रत्नागिरी : शहरातील राधेय संकुलमध्ये राहणारे हरिश्चंद्र गणपत सुर्वे (वय ६०) यांचा चक्कर येऊन बाल्कनीत पडल्याने मृत्यू झाला. ही घटना १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९:४० च्या सुमारास घडली असून, या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या १५ वर्षांपासून ते मधुमेहाने (डायबिटीज) त्रस्त होते आणि त्यांना इन्सुलिन उपचार सुरू होते. एक महिन्यापूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका (हार्ट ब्लॉकेज) आल्याने कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १० ऑगस्ट रोजी ते बाल्कनीत चालत असताना अचानक चक्कर येऊन ते फरशीवर पडले. आवाज ऐकून नातेवाईकांनी त्यांना पाहिले असता, कोणतीही हालचाल होत नव्हती. तात्काळ खासगी वाहनातून रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी नोंद पोलिसांनी केली आहे.
रत्नागिरी : चक्कर येऊन पडल्याने वृद्धाचा मृत्यू
