GRAMIN SEARCH BANNER

श्रीक्षेत्र बुरंबाळी येथील गगनगिरी आश्रमात धार्मिक कार्यक्रम संपन्न!

कोल्हापूर : प्रतिवर्षाप्रमाणे याहीवेळेस कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील श्रीक्षेत्रबुरंबाळी येथील (तुळशी तलाव) जवळील प्रसिद्ध गगनगिरी आश्रमात विविध धार्मिक कार्यक्रम नुकतेच असंख्य भाविक भक्ताचे उपस्थितीत संपन्न झाले.

यानिमित्ताने आश्रमस्थानी श्रावणमास  तसेच गुरूपुष्यामृत योगाचे निमित्ताने नामस्मरण- तसेच भजन-पूजन-प्रवचन व सामुहिक   श्री.सत्यनारायण महापूजा आदि धार्मिक कार्यक्रम  असंख्य भाविक भक्तांचे चैतन्यदायी उपस्थितीत  श्रध्दा-प्रेम-भक्तिभावाने संपन्न झाले.

      यानिमित्ताने श्रीक्षेत्र पाटथर येथील स्वामी गगनगिरी महाराज सत्संग केंद्राचा नामस्मरण कार्यक्रम देखील संपन्न झाला.सदरहू कार्यक्रम हा बुरंबाळी ग्रामस्थ व आश्रमभक्त मंडळ,तसेच पाटथर गगनगिरी सत्संग केंद्र(देवगड)यांच्या वतीने संपन्न झाला.

       सदर धार्मिक उत्सवास आश्रम व परिसरातील गगनगिरी भक्तमंडळी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक मंडळीनी बहूसंख्येने उपस्थित राहून दर्शन-आशिर्वाद आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.

याप्रसंगी सर्वानी गगनगिरी महाराज आश्रमाची तन- मन- धनाने सेवा करीत नित्य गगनगिरी नामस्मरण करावे असा सदुपदेश आश्रमाचे प्रमुख श्री. सदानंदगिरी महाराज यांनी उपस्थित भक्तवृंदास केला.

Total Visitor Counter

2475011
Share This Article