GRAMIN SEARCH BANNER

आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या बालजगतमध्ये चमकणार पटवर्धनचे विद्यार्थी

रत्नागिरी – आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर पटवर्धन हायस्कूलच्या चार विद्यार्थ्यांची बाल जगत या लहान मुलांच्या कार्यक्रमात मुलाखत प्रसारीत होणार आहे.

इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर नित्या संदीप फणसे राज्यात तिसरी, आदित्य महेश दामले राज्यात सहावा, ललित अनंत डोळ राज्यात बारावा  आणि मधुरा संजय पाटील राज्यात सोळावी आली आहे.  आपल्या बाल दोस्तांना बालजगत या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी या शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात त्यांनी घेतलेली मेहनत, मार्गदर्शन, घरच्यांचा पाठिंबा, वेगवेगळे छंद अशा विविध विषयावर गप्पा मारत अपयशाने खचून जाऊ नका असा अनमोल संदेशही दिला आहे. १०१.५ दशांश मेगा हर्ट्झ या एफ. एम. वाहिनीवर आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर 27 जुलै रोजी सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी हा कार्यक्रम प्रसारीत होणार आहे.

Total Visitor Counter

2455557
Share This Article