GRAMIN SEARCH BANNER

गणराज क्लबच्या तायक्वांडो पट्टूंचे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत नेत्रदीपक यश!

Gramin Search
16 Views

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील गणराज तायक्वांडो क्लब आणि रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत गणराज क्लबच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश संपादन केले आहे. साळवी स्टॉप येथील गणराज तायक्वांडो क्लबच्या प्रांगणात २९ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या परीक्षेला जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण कर्रा आणि क्लबच्या सचिव व प्रमुख प्रशिक्षक सौ. रंजना मोडूळा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.

या परीक्षेत विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करत विविध बेल्ट्स पटकावले. यात यलो बेल्ट मिळवणाऱ्यांमध्ये विधी विवेककुमार दुबे आणि अहद नवीद वस्ता यांचा समावेश आहे. ग्रीन बेल्टसाठी नीरज प्रशांत मकवाना, आहाना आशिष रसाळ आणि आध्या आशिष रसाळ यांनी यश मिळवले. तर ब्लू बेल्टचे मानकरी जैनब वसिम काझी आणि तीर्था प्रशांत मकवाना हे ठरले. रेड बेल्ट प्राप्त करणाऱ्या खेळाडूंमध्ये अनया अभिज्ञ वणजू, समर्थ सुशांत विचारे आणि अथर्व आत्माराम मुरकुटे यांचा समावेश आहे.

या सर्व यशस्वी तायक्वांडो पट्टूंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, खजिनदार व्यंकटेशराव कर्रा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कर्रा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, शाहरुख शेख, मिलिंद भागवत, तसेच गणराज क्लबच्या पदाधिकारी अध्यक्षा वकील सौ. पूजा शेट्ये, उपाध्यक्ष सौ. साक्षी मयेकर, सचिव रंजना मोडूळा, सदस्य सौ. स्नेहा मोरे, श्री. परेश मोंडूळा, श्रीमती शलका जावकर, पालक वर्ग, टेक्निकल प्रमुख-परेश मोडूळा, आणि सिनियर खेळाडू डॉ. मयुरेश नडगिरी, अदिती शिवगण, गौरी विलणकर, त्रिशा मयेकर, साहिल शिवगण, स्वानंद तुपे, अखिलेश वांयगणकर आदी मान्यवरांनी आणि हितचिंतकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3209948
Share This Article