GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत दोन कारची धडक; एक जखमी

Gramin Varta
68 Views

दापोली / प्रतिनिधी: दापोली तालुक्यातील साखळी येथील निसर्ग नर्सरीजवळ ईको गाडी आणि होंडा कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक जण जखमी झाला. ही घटना शुक्रवार, १२ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज संतोष कदम (वय २७, रा. आपटे मढलेवाडी) हे ईको गाडीतून प्रवास करत होते. नितीन रांगोळी हे वाहन चालवत असताना आपटीहून गावतळेकडे जात असताना निसर्ग नर्सरीजवळ समोरून भरधाव वेगात येणाऱ्या होंडा कारने ईको गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात ईको गाडीत बसलेले सुरज कदम जखमी झाले.

होंडा कार (एमएच ४३ बीएन २६७७) आर्यन गणेश निकम (वय २१, रा. जुईनगर, नवी मुंबई) चालवत असल्याची माहिती आहे. अपघातानंतर जखमीला तातडीने प्राथमिक उपचारासाठी हलविण्यात आले. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3367000
Share This Article