कचरा डेपो स्थलांतरित करण्याचे मुख्याधिकाऱ्यांनी दिले लेखी पत्र
लांजा : कुवे येथील कचरा डेपो स्थलांतरित करण्यात आल्याचे लेखी पत्र मुख्याधिकारी यांनी दिल्याने कुवे संघर्ष समितीच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी छेडण्यात आलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे.
लांजा नगरपंचायतीच्यावतीने लांजा शहर परिसरात साठणारा कचरा गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कुवे येथील जागेत टाकला जात होता. त्यामुळे या ठिकाणी कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि पाणी प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे कुवे संघर्ष समितीच्यावतीने संबंधित कचरा डेपो अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी केली होती. मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याने अखेर कुवे संघर्ष समितीच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.
कुवे ग्रामस्थांच्या उपोषणाची दखल घेत अखेर लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी कचरा टाकण्यासाठी भाडेतत्त्वावर जागा घेण्यासाठी जाहीरात काढली होती. त्यानंतर ९ ऑगस्ट पासून कुवे येथील कचरा डेपो स्थलांतरित करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित कचरा डेपोची आमदार किरण सामंत यांनी जागेवर जाऊन पाहणी केली होती.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार कुवे येथील कचरा डेपो स्थलांतरित करण्यात आल्याने कुवे संघर्ष समितीच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी छेडण्यात आलेले उपोषण हे मागे घेण्यात आले असल्याची माहिती कुवे संघर्ष समितीचे पदाधिकारी परवेश घारे यांनी दिली आहे. संबंधित कचरा डेपोची आमदार किरण सामंत यांनीही जागेवर जाऊन पाहणी केली होती.
लांजा कुवे येथील संघर्ष समितीच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी छेडण्यात येणारे उपोषण अखेर मागे
