GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत सीआयओतर्फे उर्दू शाळेत वृक्षारोपण; २०० विद्यार्थी, ८ शिक्षकांचा सहभाग

Gramin Varta
8 Views

रत्नागिरी: कोकण नगर येथील उर्दू शाळेत सीआयओ (CIO – Council for Indian Overseas) रत्नागिरी शाखेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शाळेतील २०० विद्यार्थ्यांनी आणि ८ शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रुकने जमात इम्तियाज नकाडे, नाझिमा-ए-जमात वाहिदा शेख, सीआयओ प्रभारी मरियम भोम्बळ आणि करून बहेन सुमैय्या मुकादम उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात म्हणून मुलांना झाडांचे वाटप करण्यात आले. सीआयओच्या विद्यार्थ्यांनी कुराण पठण (किरात), प्रतिज्ञा (अहद) आणि कापलेल्या झाडाची आत्मकथा (काटे पेड की आपबीती) सादर केली. शाळेतील विद्यार्थ्यांनीही  हमद, कुराण पठण (किरात), भाषणे आणि ॲक्शन साँग सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

संपूर्ण कार्यक्रमाचा समारोप वृक्षारोपण करून करण्यात आला. सीआयओ प्रभारी मरियम भोम्बळ यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. निसर्गाचे महत्त्व आणि पर्यावरणाचे संवर्धन याबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

Total Visitor Counter

2647788
Share This Article