GRAMIN SEARCH BANNER

मुंबई विद्यापीठ आयोजित ५८ व्या युवा महोत्सवात डी कॅड देवरुख महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

देवरूख:-  मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवामध्ये क्रेडार संस्थेच्या देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन (डी कॅड) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे.

नुकत्याच भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी येथे पार पडलेल्या साउथ झोन युवा महोत्सवामध्ये सोळा महाविद्यालये सहभागी झाली होती. नाट्य, नृत्य, संगीत, वाड;मय, ललित कला इत्यादी सांस्कृतिक स्पर्धांमध्ये जवळपास ६०० विद्यार्थी सहभागी झाले होते. डी कॅड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ऑन दी स्पॉट पेंटिंग, कार्टूनिंग, रांगोळी, मेहेंदी डिझाईनिंग या प्रकारामध्ये यश मिळविले.

ऑन दी स्पॉट पेंटिंग – मृणाल पंडित – प्रथम क्रमांक
कार्टूनिंग – देवाशिष पवार – प्रथम क्रमांक
रांगोळी – अमर राऊळ  – द्वितीय क्रमांक
मेहेंदी डिझाईनिंग – अल्मा सोलकर – तृतीय क्रमांक
अशी पारितोषीके प्राप्त केली असून त्यांची पुढील अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. अंतिम फेरी ही मुंबई विद्यापीठामध्ये होणार असून विद्यार्थ्यांनी लगेचच सराव सुरु केला आहे.या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्रा. अवधूत पोटफोडे व श्रीकांत जागुष्टे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अजय पित्रे व भारती पित्रे, सेक्रेटरी विजय वीरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य रणजीत मराठे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले व त्यांना पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitor Counter

2475116
Share This Article