GRAMIN SEARCH BANNER

जुन्या वादातून तरुणावर दगडाने हल्ला; भरणे येथील दोघांविरुद्ध गुन्हा

Gramin Varta
117 Views

खेड : तालुक्यातील भरणे येथे मागील भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर दगडाने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अनिकेत साळुंखे आणि अजिंक्य साळुंखे (रा. भरणे, आठवडा बाजार परिसर) यांच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सनी नारायण भोसले (वय २६, रा. भरणे) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, भोसले हे आपल्या दुचाकीवरून खेड येथून भरणेकडे जात असताना आरोपींनी जुन्या वादातून त्यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना दुखापत केली. घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3366983
Share This Article