GRAMIN SEARCH BANNER

दापोली : बुरोंडी–लाडघर परिसरात घरफोड्यांची मालिका; ग्रामस्थ भयभीत

Gramin Varta
28 Views

दापोली : तालुक्यातील बुरोंडी आणि लाडघर परिसरात घरफोड्यांच्या सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंद घरे टार्गेट करणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी परिसरात अक्षरशः उचापती मांडल्या आहेत.

या भागातील अनेक कुटुंबे मुंबईसह इतर शहरांमध्ये राहतात. त्यामुळे त्यांच्या घरांना कायम कुलूप असते. याच परिस्थितीचा फायदा घेत चोरटे दिवसा आणि रात्री घरफोड्या करत असल्याचे उघड झाले आहे.

अलीकडेच, सकाळी साधारण 9 ते दुपारी 2 या वेळेत बुरोंडी–लाडघर रस्त्यालगत असलेल्या एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्यात आल्याची घटना समोर आली. सलग होत असलेल्या या प्रकारांमुळे ग्रामस्थांमध्ये संताप असून पोलीस प्रशासनाने तातडीने चोरट्यांवर अंकुश ठेवावा, अशी मागणी होत आहे.

Total Visitor Counter

3388221
Share This Article