GRAMIN SEARCH BANNER

नगरपंचायत निवडणुक: गाव विकास समिती व आपची मोठी घोषणा; डॉ.कानिटकर आरोग्य सुविधा केंद्र सुरू करणार

Gramin Varta
103 Views

डॉ. कानिटकर यांच्या ‘देवरुखातील रुग्णसेवेच्या सन्मानार्थ’ पुढाकार

देवरुख : आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव विकास समिती आणि आपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ दिक्षा खंडागळे यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. डॉ. कानिटकर यांच्या ‘देवरुखातील रुग्णसेवेच्या सन्मानार्थ’, नगरपंचायत मार्फत ‘डॉ. कानिटकर आरोग्य सुविधा केंद्र’ सुरू करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे.

गाव विकास समिती-आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. दीक्षा रविंद्र खंडागळे यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मतदारांसमोर ठेवला आहे.

या आरोग्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना खालीलप्रमाणे लाभ मिळतील

गरजू नागरिकांना महागड्या उपचारांसाठी मदत.

ऑपरेशनसाठी सरकारी योजना: ऑपरेशनसाठी लागणाऱ्या सरकारी योजनांची माहिती आणि लाभ एकाच छत्राखाली उपलब्ध होणार.

सर्व आरोग्य सुविधा: सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील.

यामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही आणि त्यांना योग्य पद्धतीने उपचार मिळतील, असे दिक्षा खंडागळे यांनी स्पष्ट केले आहे.

गाव विकास समिती आणि आम आदमी पार्टी कडून मतदारांना आवाहन

गाव विकास समिती’ आणि ‘आम आदमी पार्टी’ने स्थानिक नागरिकांना ‘झाडू’ या चिन्हा समोरील बटन दाबून दीक्षा खंडागळे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून ही आरोग्य सुविधा योजना लवकरच प्रत्यक्षात उतरू शकेल.
हा मुद्दा निवडणुकीत आरोग्य क्षेत्राला किती महत्त्व दिले जाते, हे अधोरेखित करणारा असून, नागरिकांचे लक्ष वेधून घेणारा ठरण्याची शक्यता आहे.

Total Visitor Counter

3199525
Share This Article