GRAMIN SEARCH BANNER

देवरुख नगरपंचायत निवडणूक: सौ. दीक्षा खंडागळे यांनी ‘आई-बाबा आरोग्य सेवा योजना’ राबवण्याची केली घोषणा

Gramin Varta
102 Views

नगराध्यक्ष म्हणून निवडून दिल्यास दर तीन महिन्यांनी जेष्ठ नागरिकांची नगरपंचायत मार्फत होणार मोफत आरोग्य तपासणी

देवरुख :नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव विकास समिती आणि आम आदमी पार्टीच्या देवरुख नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. दीक्षा रवींद्र खंडागळे यांनी देवरुख शहरासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. नागरिकांनी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिल्यास नगरपंचायतच्या माध्यमातून ‘आई-बाबा आरोग्य सेवा योजना’ राबवण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे, ज्यामुळे शहरातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची त्यांच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी केली जाईल.

गाव विकास समिती व आम आदमी पार्टी युतीच्या उमेदवार दीक्षा खंडागळे यांनी घोषणा केलेल्या आई बाबा आरोग्य सेवा योजनेचा तपशील:
योजनेचे नाव: आई-बाबा आरोग्य सेवा योजना
लाभार्थी: देवरुख शहर व सर्व वाड्या-वस्त्यांमधील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक.
सेवा: दर तीन महिन्यांनी नगरपंचायत मार्फत मोफत आरोग्य तपासणी घरी जाऊन केली जाईल.
तपासल्या जाणाऱ्या बाबी: ब्लड प्रेशर (रक्तदाब), डायबेटिस (मधुमेह) तसेच अन्य आवश्यक आजारांचे वेळीच निदान केले जाईल.

सौ. दीक्षा खंडागळे यांचा प्रचार ‘गाव विकास समिती’ आणि ‘आम आदमी पार्टी’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे, ज्याचे घोषवाक्य “देवरुख बनवू एक नंबर” असे आहे. त्यांनी या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यावर भर दिला आहे.
मतदारांनी झाडू या चिन्हावर मतदान करून दीक्षा खंडागळे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन डॉ मंगेश कांगणे यांनी केले आहे.

Total Visitor Counter

3199424
Share This Article